दोन कोटींचे सोने जप्त   

नवी दिल्ली : इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर १.९१ कोटी रुपयांचे सोने जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी राजस्तानमधील एका व्यक्तीला  अटक करण्यात आली आहे. सीमाशुल्क विभागाने रविवारी ही माहिती दिली. संशयित आरोपी दुबईहून आला होता. विमानतळावर उतरल्यानंतर त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने सीमाशुल्क विभागाच्या अधिकार्‍यांनी त्याची झडती घेतली. त्याच्या बॅगेत संशयास्पद प्रतिमा दिसल्या. त्याची तपासणी केली असता त्यामध्ये दोन किलो सोन्याचे बार आढळले. सोने जप्त करत जयपूर येथील प्रवाशाला सीमा शुल्क विभागाने अटक केली. 

Related Articles